Saturday, June 7, 2014

शिवशाहीर शिक्षक

गर्भगिरी पर्वतराजींत मांजरसुंभे (मंजर -ए-सुभा) वसलेय. निजामशाहीत या गावातील गडावर औरंगाबादकडून येणार्‍या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहाळणीचे ठिकाण बांधले आहे. या गडाशेजारीच गोरक्षनाथ गड अशा धार्मिक, ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गावात जन्मलेले कोणाचे इतिहासप्रेण जागे होणार नाही. या डोंगराच्या अंगाखांद्यावर बसून शहाजीराजांनी पुरूषार्थ गाजवितच मराठेशाहीची बिजे रोवली. शिवशाहीच्या या धगधगता इतिहासाचा वाड्यज्ञ चालविण्याचा विडा मच्छिंद्र कदम यांनी उचललाय. त्यातूनच त्यांत्यातील शाहिराचा जन्म झाला. हातात डफाऐवजी ते ढाल, तलवार घेऊन ते इतिहासाची पाने उलगडतात कोणत्याही बिदागीशिवाय. पेशाने शिक्षक असलेल्या आगळयावेगळया शाहिराबद्दल..

गर्भगिरी पर्वतराजींत मांजरसुंभे (मंजर -ए-सुभा) वसलेय. निजामशाहीत या गावातील गडावर औरंगाबादकडून येणार्‍या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहाळणीचे ठिकाण बांधले आहे. या गडाशेजारीच गोरक्षनाथ गड अशा धार्मिक, ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गावात जन्मलेले कोणाचे इतिहासप्रेण जागे होणार नाही. या डोंगराच्या अंगाखांद्यावर बसून शहाजीराजांनी पुरूषार्थ गाजवितच मराठेशाहीची बिजे रोवली. शिवशाहीच्या या धगधगता इतिहासाचा वाड्यज्ञ चालविण्याचा विडा मच्छिंद्र कदम यांनी उचललाय. त्यातूनच त्यांत्यातील शाहिराचा जन्म झाला. हातात डफाऐवजी ते ढाल, तलवार घेऊन ते इतिहासाची पाने उलगडतात कोणत्याही बिदागीशिवाय. पेशाने शिक्षक असलेल्या आगळयावेगळया शाहिराबद्दल.. राठी मातीचा इतिहास, शूर मराठय़ांची कहाणी, छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांनी लढलेल्या लढाया यांची माहिती भावी पिढीला कळावी, त्यातून त्यांना बोध घेता यावा यासाठी पोवाडे, व्याख्यानाद्वारे महानाट्याद्वारे, स्वराज्याचा इतिहास जागविला जात आहे. महाराष्ट्राने अनेक शिवशाहीर दिलेले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातील एक खेडेगावातून गर्भगिरी पर्वत रांगेतील डोंगरपठारावर हातात तलवार घेऊन नरवीर तानाजीच्या वेशात इतिहास उलगडून दाखवतात. गर्भगिरीच्या कुशीतील मांजरसुंभा येथील ते सुपूत्र. नवोदित शिवशाहीर म्हणून नावारूपाला आले आहेत.
कदम गुरूजी राहुरी तालुक्यात मोकळओहळ येथे नोकरीत आहेत. नोकरी करत असताना युवा पिढीला मराठय़ांचा इतिहास समजून सांगण्याचे काम करत आहेत. आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवकाळ उभा करण्याची किमया ते सहज निर्माण करतात.
'छत्रपती शिवराय व आजचा महाराष्ट्र' या विषयावर तानाजी मालुसरे यांच्या वेषात श्रोत्यांपुढे प्रत्यक्ष ऐतिहासिक प्रसंग शब्दानेच उभे करणारे शिवकाळातील उदाहरणे व आजच्या काळातील उदाहरणे तुलनात्मक सादर करून लोकांना पोटधरून हसायला लावणारे. मात्र, हे करत असताना श्रोत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असून सलग दोन तास एकाच जागी खिळवून ठेवण्याचे कसब या नवोदित शिवशाहीराने कमावले आहे.
तरूणपणापासून आपण शिवशाहीचा इतिहास इतरांना समजावून सांगवा असे वाटत होते. मात्र, त्यावेळची परिस्थिती वर मात करणे आद्य कर्तव्य होते. यासाठी शिक्षण आणि नोकरी मिळवणे गरजेचे होते. नोकरी मिळाली, आयुष्यात स्थिरता येत आहे, असे लक्षात येताच सुरूवातील राजकीय व्यासपीठावरून भाषणांना सुरूवात केली.
राजकारणी मंडळींनीदेखील माझ्या वक्तृत्वाचा फायदा घेतला. सुरूवातीला माझ्या ते लक्षातच आले नाही. अनेक सभा मी गाजविल्या. मात्र, त्यानंतर राजकारणी आपला वापर करत असल्याचे माझ्या लक्षात आले. यामुळे राजकारण्याच्या चक्रव्यूवहातून बाहेर पडण्याचा निश्‍चिय केला आणि नव्या जोमाने पुन्हा शिवशाहीचे संदर्भाचा अभ्यास आणि वाचन सुरू केले.
कदम हे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून, त्यांचे शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, तरुण मंडळे, सप्ताह कार्यक्रम, वाढदिवस, लग्नाच्या वरातीऐवजी कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांतून त्यांच्या शाहिरीची ललकारी ऐकायला मिळते. श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेण्याची कला त्यांनी अवगत केल्याने शाळा ,महाविद्यालयातील तरूण कदम यांच्या व्याख्यानाने भारावून जातात.
त्यांच्या व्याख्यानातून मातृभक्ती, गुरूभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रृणहत्या यांचे सोदाहरण व्याख्यानाने तरुणांना अंतर्मुख करण्याची क्षमता कदम तरुणांमध्ये निर्माण करतात. त्यांचे आतापर्यंत नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले असून, गर्भगिरीची ही शिवशाहिरी राज्याच्या कानाकोपर्‍यात निनादत आहे. त्यांचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
शिवशाहीचे व्याख्याने देतांना इतर शाही हातात डफ घेतात. मी मात्र, तलवार आणि ढाल धरतो. त्यातून वेगळेच वातावरण तयार होते. अंगावर तानाजीचा पेहराव, हात ढाल, तलाव आणि मुखी शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास यातून सर्ववातावरण भारावून जाते. व्याख्यानाच्या दोन तासांच्या कालावधीत मी स्वत:ला विसरून जातो.
शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या पराक्रम, त्यांचे विचार आणि आचार आचारणात आणणे आवश्यक आहे. यासाठी आपला प्रयत्न सुरू असून शिव व्याख्यानाच्या माध्यमातून जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
 
 
(2 जुन 2014 रोजी लोकमत पेेपर मध्‍ये प्रसिद्ध बातमी झालेली आमच्‍या तालूक्‍यातील बहुगुण संपन्‍न व्‍य‍क्‍तीमत्‍व )

परिचय- श्री.मच्छिंद्र कदम 
उपाघ्‍यापक, मोकळओहळ, केंद्र उंबरे ,ता.राहूरी


@SGTelore