Wednesday, April 30, 2014

तालुक्‍यातील सेवाजेष्‍ठता यादी 2014

NEW  तालुकापातळी सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्‍ठता यादी सन 2014 


महत्‍वाची सुचना;

सर्व शिक्षकांनी सेवाजेष्‍ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.

Tuesday, April 29, 2014

जिल्‍हास्‍तरासाठी तालुक्‍यातील सेवाजेष्‍ठता यादी

   सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्‍ठता यादी सन 2014 


महत्‍वाची सुचना;

सर्व शिक्षकांनी सेवाजेष्‍ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.

Sunday, April 20, 2014

आजचे शिक्षण : एक दृष्टीक्षेप

मा.श्री.बाळासाहेब धनवे , गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती,राहुरी

सुसंस्कृत समाजाच्या जिवनात शिक्षणाला पायाभुत महत्व आहे.त्यामुळे आजच्या शिक्षणाचा विचार हा नेहमी उदयाच्या संदर्भात करावा लागतो.लहान वयातून व्यक्तीचे शिक्षण घरच्या व आजूबाजूच्या परिसरातील वातावरणातून होत असते याला आपण सहज शिक्षण म्हणतो. व्यक्तीच्या वृत्ती - प्रवृत्ती घडविण्याचे बरेचसे कार्य या सहज शिक्षणाद्वारे होत असते. वातावरणातून सहजतेने होत जाणारे शिक्षण हे बालकाच्या आयुष्याचा पाया घालणारे शिक्षण असते.
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच अग्रक्रमाने बालकांना प्रथम स्थान देऊन, घरातील व परिसरातील सहज शिक्षणाकडे एक पायाभूत अशी शिक्षण व्यवस्था म्हणून पाहावे लागेल. या करीता आई वडिलांचे रुपांतर सृजाण पालकांमघ्ये व्हावे यासाठी पालक शिक्षणाची, पालक प्रशिक्षणाची सोय आपल्याला सार्वत्रीकरीत्या निर्माण करावी लागेल व पालक प्रबोधन केंद्रे ठिकठिकाणी उघडावी लागेल. त्याच बरोबर वृत्तपत्रे, मासिके,आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट यांच्या साह्याने शिक्षण सहजतेने व सातत्याने बालकांकरीता मिळत राहिल अशी व्यवस्था समाजात निर्माण करावी लागेल.
6 ते 14 वर्षापर्यंतच्या वयोगटाचा विचार औपचारीक शिक्षण व्यवस्थेतून सहज शिक्षण असा होत असतो. बालकांच्या जिवनातील हा काळ विविध क्षमतांच्या दृष्टिने पाया भरणीचा काळ असल्याने या काळात बालकांना मिळणारे पोषक वातावरण आणि शिक्षण हे त्यांच्या जिवनावर दूरगामी परिणाम करणारे असते. त्यामुळे समाजाचे या वयोगटावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत व्हायला हवे. बरेचदा कुटुंबातील व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण पोषक नसते. अशा वेळी औपचारीक शिक्षणव्यवस्था बाल शिक्षण घडविण्यास कामी येते. बालकांच्या बाबतीत घर,परिसर, शाळा या सर्वांमध्ये एक सुसंगती निर्माण होणे गरजेचे असते. पालक प्रबोधन, शिक्षक प्रशिक्षण व समाज प्रबोधन या सर्वांचा आग्रह बाल शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी झाला पाहिजे.

शिक्षण विषयक वातावरण निर्मिती ही बालकेंद्री शिक्षणासाठी प्राथमिक अट आहे. शाळांमध्ये प्रयत्नपूर्वक व विचारपूर्वक असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली शाळा ही बालसुलभ व मनाला आकर्षित करणारी असेल तर मुलांना तेथे दररोज जाणे आवडेल. चांगली शाळा, इमारत, शाळेसमोर मौदान, सुंदर परसबाग, हवेशिर वर्गखोल्या अशा सर्व गोष्टी मुलांचे मन आकर्षित करणाज्या आहेत.शाळेतील वातावरण मुलांना रोज शाळेत यावेसे वाटेल म्हणजेच आनंद देणारे,खेळातून शिकता येणारे,असे शिक्षण सर्वव्यापी होऊ शकेल. हे शिक्षण जिवनोपयोगी व व्यावहारीक तसेच भविष्यात उपजिविकेचे साधन प्राप्त करून देणारे असेल.
सध्याच्या शाळांची परिस्थिती पाहता आनंदायी शिक्षणाचे उद्यिष्टे गाठण्यासाठी तीन बदल अपेक्षित आहेत.
1. शाळांच्या भौतिक सुविधामध्ये सुधारणा घडवून आणने.
2. शाळांमधून शिक्षणाभिमुख व विद्यार्थीप्रेमी असा प्रेरक शिक्षक वर्ग तयार झाला पाहिजे.
3. शिक्षणाची पध्दती विद्यार्थ्या मध्ये कुतूहल,जिज्ञासा व स्वयंअघ्ययानाची प्रेरणादेणारी असली पाहीजे.                          तसे पाहता शिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रीया आहे.अलीकडच्या काळातील आलेला नविन ज्ञानसंरचनावादामुळे आधिचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. 2005 साली एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली ने राष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूण दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे या मागील भूमिका सांगणारा ज्ञानरचनावाद त्यांनी दिला.ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे, तर मुल कसं शिकत ?याचा सर्व अंगाशी शास्त्रीय अभ्यासकरुन केलेली मांडणी. मुलं स्वतंत्र विचार करतात. मुलांचे शिकणे केवळ शाळेत नाही तर घर,परिसर,समाज असे सगळीकडे होते. स्वत:च्या अनुभवातूनही त्यांचे शिकणे सतत सुरु राहते. मुलांची प्रत्येक कृती म्हणजे ज्ञानाचा स्त्रेात असते. मुलं स्वत: ज्ञानाची निर्मीती करतात याचाच अर्थ मुलांचे जिवन आणि शिक्षण हे वेगळे करता येत नाही. मात्र त्यांचा मेळ घालायला हवा. जिवनाशी शिक्षण जोडण्यासाठी शिक्षणात मुलांचे सांस्कृतीक भांडवल वापरले पाहिजे अशा अध्ययन अनुभवांची, कृतीची रेलचेल असली पाहिजे यावर ज्ञानरचना वादाचा भर आहे.शिक्षण क्षेत्रातील हे नवे आव्हान ठरत आहे.सन 2009 मध्ये आलेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमामुळे परीक्षेचे महत्व काहिसे कमी झाले.परीक्षेच्या तणावातून बाल शिक्षण बाहेर आले. या ऐवजी सध्या वर्षभर सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन सुरु आहे. केवळ पेपर लिहून पास होणे नाही तर निरनिराळ्या तंत्राच्या साह्याने मुलांच्या शिकण्याच्या नोंदी घेतल्या जात आहे.इयत्ता 8 वी पर्यंत गुणांऐवजी श्रेणी दिल्या जात आहे. मुलांना व्यक्ती म्हणून समजून आणि समावून घेणारा बालस्नेही दृष्टिकोन शिकवला जात आहे. एका अर्थाने शिक्षणाचे लोकशाहीकरण होण्यास यामुळे मदत झाली आहे.एक मात्र खरे की एकापाठोपाठ एक असे वेगाने आलेल्या बदलांनी शिक्षण विश्वात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये या साठी या बदलांचे स्वागत करीत असतांना ते अतिशय काळजीपूर्वक संयमाने लागू करायला हवे. त्या करता इथला समाज,प्रादेशिकता,संस्कृती,लोकांच्या जगण्यातील विविधता, वौशिष्ट एकूणच शाळेतील पर्यावरणावर परिणाम करणारे घटक विचारात घ्यायला हवे. या कामात अनुभवी व्यक्ती स्वयंसेवी संस्था, शासन,संघटना तसेच प्रयोगशील शाळांचा सहभाग घेण्यात आला पाहिजे. परस्पर सहभागाने आणि पारदर्शकपणे एकमेकांचे काम सुधारत पुढे जायला हवे.आज हा खुलेपणा शिक्षक, शासन,स्वयंसेवी संस्था या सर्वांनीच दाखविण्याची गरज आहे.या सर्व घटकांच्या समन्वयाने आजच्या शिक्षणातील आव्हाने पेलून नविन रचनावादी शिक्षणाचा मळा फुलेल, बहरेल असा विश्वास वाटतो.